आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना हा निधी:ग्रामपंचायत व पंचायत समितीचे 57 कोटी 24 लाख ट्रेझरित

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी १५ व्या वित्त आयोगांतर्गत दुसऱ्या हप्त्याचे ५७ कोटी २४ लाख १ हजार ५७ रूपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. त्यानुसार ग्रामपंचायती व पंचायत समित्यांना या निधीच्या वाटपासाठीची बिले जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने तयार करून ट्रेझरीत पाठवली आहेत. सोमवारनंतर (१ ऑगस्ट) ट्रेझरीमार्फत वितरीत होण्याची प्रक्रिया सुरू होईल.

पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २०२१-२०२२ च्या बंदीत ग्रँटच्या दुसऱ्या हप्त्याचा निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार हा निधी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेला पंचायत समितीसाठी ६ कोटी ३७ लाख ३३ हजार ३५ रूपये तर ग्रामपंचायतींसाठी ५० कोटी ८६ लाख ६८ हजार २२ रुपयांचा निधी प्राप्त झाला. जिल्हा परिषद स्तरासाठी मात्र, अद्याप निधी उपलब्ध झाला नाही.

पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना हा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात वितरीत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात दहा दिवसांपासून बिले तयार करण्याची कार्यवाही सुरू होती. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला याबाबत विचारले असता, पंचायत समिती व ग्रामपंचायतींची बिले २९ जुलैला ट्रेझरीकडे पाठवली असल्याची माहिती मिळाली. तसेच अर्थ विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून ग्रामपंचायती व पंचायत समितीला निधी वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे स्पष्ट केले. ग्रामपंचायतींनी कामांचे नियोजन केले असले तरी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतरच कामाला सुरूवात होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...