आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:कार्यालयीन वेळेत मनपात 59 कर्मचारी अनुपस्थित

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे यांनी गुरुवारी सकाळी महापालिका मुख्यालयात केलेल्या तपासणीमध्ये ५९ कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित आढळून आले. या सर्वांना नोटिसा बजावून कारवाई केली जाणार आहे. आयुक्त पंकज जावळे यांनी कामचुकार व कार्यालयीन वेळेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कार्यालयात तपासणीसाठी अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांना आदेश दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पठारे व आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे यांनी मनपा मुख्यालयातील विभागात जाऊन तपासणी केली. अनेक कर्मचारी उशिराने कार्यालयात आले. तर काही कार्यालयात उपस्थित नव्हते. अशा ५९ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून आयुक्तांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...