आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई दरबारी दर्शनासाठी गर्दी:6 लाख भाविकांनी साई दरबारी लावली हजेरी

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नववर्षाच्या निमित्ताने साईनगरीत होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा ओघ नववर्षाच्या पहिल्या दिवशीही कायम होता. नवीन वर्षाची सुरूवात साई दरबारी करण्याच्या भावनेतून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. गेल्या दोन दिवसांत ६ लाख भाविकांनी साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले, अशी माहिती साई संस्थानाच्या सूत्रांनी दिली.

नववर्षानिमीत्त साई मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. रविवारी वर्षारंभी साई मूर्तीवर सुवर्णालंकार घालण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई मंदिरात साई नामाचा व भजनांचा गजर करण्यात आला. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बाराव रेड्डी आदींनी मध्यरात्रीच साई दर्शन घेऊन नववर्षाचा श्रीगणेशा केला.

बातम्या आणखी आहेत...