आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा:ट्रॅक्टर शोरूम मालकाची 6.36 लाखांची फसवणूक

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शोरूममधून ट्रॅक्टर घेतल्यानंतरही ट्रॅक्टर घेतला नसल्याचा कागांवा करून शोरूम मालकाची ६ लाख ३६ हजार ७४३ रूपयांची फसवणूक करणार्‍या दोघांविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साई सोनालिका ट्रॅक्टर शोरूमचे मालक विजय सदाशिव वाकळे (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. विजय ससाणे (रा. धामणगाव ता. आष्टी, जि. बीड) व तुषार हरी खंडागळे (रा. पाटण सांगवी ता. आष्टी, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादीचे कोठी रोड, मार्केटयार्ड येथे साई सोनालिका ट्रॅक्टर या नावाने ट्रॅक्टर विक्रीची एजन्सी असुन सदर एजन्सीचे सावेडीत गोडाऊन आहे. एजन्सी मार्फत विक्री केलेल्या ट्रक्टरची डिलीव्हरी गोडाऊनमधून होते. ७ सप्टेंबर रोजी विजय ससाणे आणि तुषार खंडागळे यांनी फिर्यादीच्या ऑफिसला येवून पाचशे रूपये रोख पावती भरुन कविता हरी खंडागळे यांच्या नावाने ट्रॅक्टरची बुकिंग केली.

८ ऑक्टोबर रोजी तुषारने त्याची आई कविता हरी खंडागळे या नावाने एचडीएफसी शाखा पाईपलाईन रोड येथे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सहा लाख ३६ हजार ७४३ रूपयांची कर्ज फाईल मंजूर केली. त्यानंतर तुषार आणि विजय या दोघांनी फिर्यादीच्या एजन्सीमध्ये येऊन एक लाख रूपये भरले. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी सकाळी तुषार आणि विजय या दोघानी रोख रक्कम ४१ हजार रूपये भरून सोनालिका ट्रॅक्टर खरेदी केला.

दरम्यान, त्यानंतर एचडीएफसी बँकने मंजूर लोन रक्कम फिर्यादीला दिली नाही. फिर्यादीने तुषार खंडागळे यास फोन केला असता तुषारने सदरचा ट्रॅक्टर विजय ससाणे याने ताब्यात घेतला आहे, असे कळविल्याने फिर्यादीने विजय ससाणे यांना फोन केला असता आम्ही दोघांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतलेला आहे, असे कळविले आहे. त्या दोघांनी संगनमताने फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...