आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लम्पी मृत्यू:एकाच दिवसात लम्पीमुळे 64 जनावरांचा मृत्यू

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल ६४ जनावरांचा या रोगामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १५६४ जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे आहे. जिल्हा प्रशासनाकडून स्वच्छ गोठा उपक्रम हाती घेतला आहे. गोठा स्वच्छ ठेवण्याबरोबरच डास व माशांचे नियंत्रण करण्यासाठी पशुपालकांमध्ये जागृती सुरू आहे. विविध उपाययोजना राबवल्यानंतरही लम्पीचा फैलाव कमी झालेला नाही. जिल्ह्यात गुरुवारअखेर १५०० जनावरांचा मृत्यू झाला होता शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार मृत्यूचा आकडा १५६४ झाला आहे. आतापर्यंत १६ हजार बाधित जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...