आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MPSC परीक्षेला 1 हजार 641 विद्यार्थ्यांनी मारली दांडी:अहमदनगरच्या 18 उपकेंद्रावर 5 हजार 11 उमेदवारांनी दिली परीक्षा

अहमदनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने शनिवारी (5 नोव्हेंबर) ला घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला 5 हजार 11 विद्यार्थी हजर‌‌ होते.1 हजार 641 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.

अहमदनगर जिल्ह्यातील 18 उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात सर्व परीक्षा केंद्रावर कडक पुढील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्वच केंद्रावर ही परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली अशी माहिती शनिवारी परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली आहे.

परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील 18 उपकेंद्रावर एकूण 6 हजार 652 उमेदवार परीक्षा देणार होते. विविध शाळा व महाविद्यालयाच्या केंद्रावर त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-5 , भरारी पथक प्रमुख-1, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख - 18 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील एकूण 625 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 144 कलम लागू करण्यात आले होते.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...