आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शटर उचकटलेले व अर्धवट उघडे:ट्रॅक्टरचे शोरुम फोडून 65 हजारांचा ऐवज लंपास

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केडगाव बायपास चौकातील किसान अॅग्रोटेक या ट्रॅक्टरचे शोरुमचे शटर उचकटून चोरट्यांनी शोरुममधील रोख रक्कम, लॅपटॉप, डीव्हीआर, असा ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी व्यवस्थापक विश्व सुनील मंडल (वय ३५, रा. इंद्र कॉलनी, तारकपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. २९ जुलै रोजी रात्री ८ ते ३० जुलै रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या काळात ही घटना घडली.

३० जुलै रोजी सकाळी वर्कशॉप मॅनेजर सागर शिंदे यांना शोरुमचे मुख्य शटर उचकटलेले व अर्धवट उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी व्यवस्थापक मंडल यांना कळवले. मंडल यांनी शोरूमचे मालक शैलेंद्र अडसुरे (रा. सावेडी) यांना घटना कळवली. त्यांनी पाहणी केली. केबीनमध्ये टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ५० हजार व आयसीआयसीय बँकेचे ८ कोरे चेक, लॅपटॉप, डीव्हीआर असा ६५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

बातम्या आणखी आहेत...