आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मोफत आरोग्य उपचारासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना २०१८ पासून सुरू केली असून या योजनेतील लाभार्थींना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जातात. जिल्ह्यात ३५ आरोग्य मित्रांच्या मदतीने या योजनेचे कार्ड जिल्ह्यातील ६ लाख ५४ हजार ८७१ लाभार्थींना मोफत दिले जाणार आहेत. हे विशेष शिबिर ५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात आयाेजित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जि. प. गट आणि पंचायत समिती गणांत आयुष्मान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड मोफत देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. सध्या उपलब्ध आरोग्य मित्रांच्या मदतीने लाभार्थींना मोफत कार्ड दिले जाणार आहेत.
जिल्हा परिषद गटात आणि पंचायत समिती गणात हे शिबिर आयोजित करावयाचे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अशोक गायकवाड यांनी केले आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटुंबात वयस्क (१६-५९ वर्षे) नसणे, कुटुंबप्रमुख महिला असणे, कुटुंबात कोणी दिव्यांग असणे, अनुसूचित जाती - जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ती- वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते. ग्रामीण परिसरातील बेघर व्यक्ती, निराधार, भीक मागणारे, आदिवासी आदी लोक कोणतीही प्रक्रिया न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याचप्रमाणे शहरी भागातील नागरिकांसाठी ही पात्रता शिथिल करण्यात आलेली आहे.
कॉम्प्युटर, इंटरनेट सेवा त्याचप्रमाणे शिबिर घेण्यासाठी किंबहुना बसण्यासाठी व्यवस्था करून दिल्यास आरोग्य मित्रांना शिबिर यशस्वीरीत्या घेता येईल. जिल्ह्यात ६ लाख ५४ हजार ८७१ लाभार्थी असून त्यात बीड तालुक्यात ६७५८१ लाभार्थी, अंबाजोगाई ५१४३६लाभार्थी, परळी ७०७८६लाभार्थी, माजलगाव ८५६५१ लाभार्थी, पाटोदा ३२४७१ लाभार्थी, गेवराई ७८०७६ लाभार्थी, केज ८००४६ लाभार्थी, धारूर ४६०४६ लाभार्थी, शिरूर कासार ४११८१ लाभार्थी,वडवणी ३१०२६ लाभार्थी, आष्टी ७०५७१ लाभार्थी आहेत.
कोण करू शकतं आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज? आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्ष किंवा त्याहून अधिक असावं. जर कोणी स्वतःहून या योजनेसाठी अर्ज करत असेल, तर त्या व्यक्तीचं नाव एस. इ. सी. सी– २०११ मध्ये असलं पाहिजे. सामाजिक, आर्थिक आणि दुर्बल घटकातील पात्र लाभार्थींची एस. इ. सी. सी– २०११ तयार करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कार्ड आवश्यक आहे.
पाच लाखांपर्यंत योजनेमध्ये होतात मोफत उपचार कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करू शकते. या योजनेंतर्गत सरकार लोकांना ''आयुष्मान भारत गोल्डन कार्ड'' प्रदान करते. या योजनेंतर्गत आयुष्मान भारत गोल्डन कार्ड द्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिक रुग्णालयात जाऊन ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळवू शकतात. -डॉ. अशोक गायकवाड, जिल्हा समन्वयक, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.