आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:नियोजन मंडळातून पालिकांना 67.83 कोटी मंजूर

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील महापालिका व नगर पालिकांना जिल्हा नियोजन मंडळातून सन २०२२-२३ या वर्षातील जिल्हास्तर नगरोत्थान योजना, नागरी दलितेतर वस्ती योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे. नियोजन मंडळाने एकूण ६७.८३ कोटींचा निधी मंजूर करत, त्यातील ६०.९८ कोटींचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे.

जिल्हा नियोजन मंडळातून नगर महापालिका व जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतींना दरवर्षी निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार नुकताच जिल्हास्तर नगरोत्थान योजना, नागरी दलितेतर वस्ती योजना व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून निधी मंजूर करून कामांचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून १९.८३ कोटी, नागरी दलितेतर वस्ती योजनेतून २०.५० कोटी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून २७.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

नागरी दलितेतर वस्ती योजना निधी
नगर मनपा - ७.२२ कोटी, श्रीरामपूर - १.७९ कोटी, संगमनेर - १.३२ कोटी, कोपरगाव - १.३१ कोटी, राहुरी - ७७.०८ लाख, देवळाली प्रवरा - ६२.३६ लाख, राहाता - ४४.९३ लाख, पाथर्डी - ५४.७४ लाख, श्रीगोंदा - ६२.६४ लाख, शेवगाव - ७७.२१ लाख, जामखेड - ७९.५७ लाख, शिर्डी - ७२.४४ लाख, अकोले - ३९.८६ लाख, कर्जत - ३६.५३ लाख, पारनेर - २६.४१ लाख, नेवासा - ४५.५० लाख, राखीव - २.०५ कोटी.

जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतील निधी
नगर मनपा - ७.०२ कोटी, श्रीरामपूर - १.७९ कोटी, संगमनेर - १.३२ कोटी, कोपरगाव - १.०९ कोटी, राहुरी - ७७.०८ लाख, देवळाली प्रवरा - ६२.३६ लाख, राहाता - ४४.९३ लाख, पाथर्डी - ५४.७४ लाख, श्रीगोंदा - ६२.६४ लाख, शेवगाव - ७७.२१ लाख, जामखेड - ७९.५७ लाख, शिर्डी - ७२.४४ लाख, अकोले - ३९.८६ लाख, कर्जत - ३६.५३ लाख, पारनेर - २६.४१ लाख, नेवासा - २०.९९ लाख, राखीव - २.०५ कोटी.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना निधी
नगर मनपा - ६.५० कोटी, श्रीरामपूर - ३.५४ कोटी, संगमनेर - ९३.५८ लाख, कोपरगाव - २.३१ कोटी, राहुरी - १.४० कोटी, देवळाली प्रवरा - १.१३ कोटी, राहाता - ९९.६१ लाख, पाथर्डी - ७९.१५ लाख, श्रीगोंदा - १.०१ कोटी, शेवगाव - १.४० कोटी, जामखेड - १.१३ कोटी, शिर्डी - १.६८ कोटी, अकोले - ५७.५९ लाख, कर्जत - ७७.२९ लाख, पारनेर - ४१.६६ लाख, नेवासा - ७७.२५ लाख, राखीव - २.१० कोटी.

बातम्या आणखी आहेत...