आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:खात्यास आधारकार्ड लिंक करून शेतकऱ्याला 6.80 लाखांचा गंडा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विनापरवानगी बँक खात्यास आधारकार्ड लिंक करून खात्यातून ६ लाख ८० हजार रूपये काढून घेत कुंभारवाडी (ता. संगमनेर) येथील शेतकर्याची फसवणूक झाल्याची घटना १८ जून ते २० ऑक्टोबर दरम्यान घडली. याबाबत संंबंधीत शेतकर्‍याने ३ नोव्हेंबर रोजी येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सायबर पोलिसांनी फिर्यादीच्या खात्यास लिंक असलेल्या आधारकार्ड नंबरवरील अनोळखी इसमाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कुंभारवाडी येथील शेतकऱ्याचे इंडियन ओव्हरसीज बँकेत खाते आहे. त्यांनी त्यांच्या बँक खात्याचा कोणताही तपशील इतर कोणालाही दिलेला नव्हता. तसेच त्यांनी कुठल्याही ओटीपी संबंधी माहिती दिलेली नव्हती. असे असतानाही अज्ञात इसमाने फिर्यादीच्या बँक खात्यास एक आधार नंबर लिंक केला व त्याद्वारे फिर्यादीच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...