आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूर तालुक्यात 693 जनावरे लंपीच्या कचाट्यात:तर 40 जनावरे मृत, 62 हजार जनावरांचे झाले लसीकरण

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर तालुक्यात ६९३ जनावरांना आतापर्यंत लंपी रोगाची बाधा झाली आहे. पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर या रोगाचा सामना करीत लसीकरण व उपचार करून ४२७ जनावरे बरी केली असली तरी ४० जनावरांचा मृत्यू झाला, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

श्रीरामपूर तालुक्यातील १३ गावांमध्ये लंपी रोगाची बाधा झालेली आहे. ज्या भागात असे जनावरे आढळले आहेत, त्या भागाच्या पाच किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाने लसीकरण पूर्ण केलेले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे ४ हजार १३२, टाकळीभान ५ हजार २९०, एकलहरे ४ हजार ५७०, खानापूर ३ हजार, उंबरगाव ४ हजार ४००, दिघी ३ हजार ५७३, भैरवनाथनगर ७ हजार ८३४, वांगी खुर्द ६ हजार ५००, भेर्डापूर ३ हजार ९००, वडाळा ५ हजार, नायगाव ७ हजार ५४, मातापूर ५ हजार १००, कमालपूर १ हजार ९०० असे एकूण ६२ हजार २५३ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

तर बेलापूर खुर्द येथे ३९ जनावरे बाधित, तर ५ मृत झाली आहेत. टाकळीभान येथे ९६ बाधित, तर ४ मृत, एकलहरे १३ बाधित व १ मृत, खानापूर ७५ बाधित, तर ८ मृत, उंबरगाव २४ बाधित व ४ मृत, दिघी १३ बाधित, भैरवनाथनगर ६० बाधित व २ मृत, वांगी खुर्द ९२ बाधित व ३ मृत, भेर्डापूर १२२ बाधित व ५ मृत, वडाळा ३५ बाधित, नायगाव ३३ बाधित ३ मृत, मातापूर ४० बाधित २ मृत, कमालपूर ५१ बाधित ३ मृत पावले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात २२६ जनावरांवर उपचार सुरू आहेत.

ऊस वाहतुकीसाठी आलेल्या बैलांचे लसीकरण गरजेचे

सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरू झालेला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध ठिकाणाहून ऊस वाहतुकीसाठी बैल आलेले आहेत. शिवाय ऊस तोड कामगार इतरही जनावरे आपल्या सोबत आणतात, त्या सर्वांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...