आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कंटेनरच्या धडकेत रिक्षातील 7 प्रवासी ठार, कोपरगाव तालुक्यातील अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा

कोपरगाव13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव (जि. अहमदनगर) तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात कोपरगाव महामार्गावर शुक्रवारी सकाळी पगारे वस्तीनजीक कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की चेंदामेंदा झालेल्या ॲपे रिक्षातील सात जणांचा मृत्यू झाला. सहा गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर कंटेनरचा चालक दर्शनसिंग गजनसिंग (४२, रा. दानामंडी, लुधियाना, पंजाब) नाशिकच्या दिशेने फरार झाला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुंबई-नागपूर महामार्गावर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कंटेरनरने (पीबी ०५, एबी ४००६) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला कट मारून कोपरगावच्या दिशेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला (एमएच १७ एजे ९०५६) धडक दिली. यात रिक्षा पूर्ण चिरडला गेला. या अपघातात रिक्षातील ७ जणांचा मृत्यू झाला. मोटारसायकलस्वारासह रिक्षातील ६ प्रवासी जखमी झाले. जखमी विलास साहेबराव खरात (३४, रा. चांदेकसारे), कावेरी विलास खरात (५, रा. चांदेकसारे), ध्रुव सागर राठोड (१७, रा. सिन्नर) आणि मोटारसायकलवरील दिगंबर चौधरी, त्यांचा मुलगा सर्वेश दिगंबर चौधरी (१२) व बहीण कृष्णाबाई गोविंद चौधरी (४२, सर्व रा. पोहेगाव) हे किरकोळ जखमी आहेत. या सर्व जखमींवर एस.जे.एस. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये पाच महिला, दोन पुरुषांचा समावेश
मृतांमध्ये राजाबाई साहेबराव खरात (६०, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), आत्माराम जम्मानसा नाकोडे (६५, रा. वावी, ता. सिन्नर), पूजा नानासाहेब गायकवाड (२०, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (२०, रा. चांदेकसारे), शैला शिवाजी खरात (४२, रा. श्रीरामपूर), शिवाजी मारुती खरात (५२, रा. श्रीरामपूर), रूपाली सागर राठोड (४०, रा. सिन्नर) यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...