आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:विखेंच्या मतदारसंघात 7 हजार 538 शेतकऱ्यांना 6 कोटी 88 लाख रुपयांचा पंतप्रधान पीकविमा

शिर्डी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राहाता तालुका व आश्वी सर्कलमधील एकुण ७ हजार ५३८ शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत स्थानिक आपत्ती पुर्वसुचनेप्रमाणे ६ कोटी ८८ लाख रूपयांची भरपाई मिळाली आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून ही भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. स्थनिक आपत्तीनुसार ही नुकसान भरपाई प्राप्त झाली असून काढणीपश्चात झालेल्या नुकसानीची भरपाई रक्कम अद्याप कंपनीस्तरावर प्रलंबित आहे. ती मदतही शेतकऱ्यांना मिळणार आहे.

खरिप हंगाम २०२२-२३ सालामध्ये राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. यात सोयाबीन, मका, बाजरी पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक होती. खरीप हंगामाची सुरवात झालेली असताना नैसर्गिक आपत्तीमुळे या पिकांना मोठा धोका पोहचला होता. पिके जमिनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते.

मतदार संघातील ७ हजार ५३८ शेतक-यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. विमा कंपनी आणि कृषी विभाग यांनी केल्या पाहणीतून पिकांचे स्थानिक आपत्तीनुसार झालेल्या नुकसानीच्या प्राप्त झालेल्या वैयक्तीक पुर्वसुचनांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना ६ कोटी ८८ लाख ७९ हजार रूपयांची पंतप्रधान पिक विमा योजनेची भरपाई जाहीर झाली. या भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.

मध्यंतरी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना पिक विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेवून महसुलमंत्री विखे यांनी कृषी विभाग आणी विमा कंपन्यांमध्ये योग्य समन्वय साधून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला. तालुक्यातील ७ हजार ५३८ शेतकऱ्यांना ६ कोटी ८८ लाख रूपयांच्या भरपाईचा मार्ग मोकळा झाला. काढणी पश्चात पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही विखे यांनी दिल्या.

समाधानाचे वातावरण
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पिक विमा भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय केले जात आहेत. आपत्तीच्या वेळी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून आता समाधान व्यक्त केले जात आहे. -रोहिणी निघुते.

महसूल मंडळनिहाय मिळालेली नुकसान भरपाई
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील संगमनेर व राहाता तालुक्यातील बाभळेश्वर महसूल मंडळात १०४२ शेतकऱ्यांना ८६ लाख ७२ हजार रुपये, लोणी महसूल मंडळात १०६५ शेतकऱ्यांना ९८ लाख २९ हजार रुपये, पुणतांबा महसूल मंडळात १५९६ शेतकऱ्यांना १ कोटी ४६ लाख रुपये, राहाता महसूल मंडळात २८३८ शेतकऱ्यांना २ कोटी ८५ लाख ३१ हजार रुपये, शिर्डी महसूल मंडळात ५४४ शेतकऱ्यांना ४९ लाख १४ हजार रुपये, आश्‍वी बु. महसूल मंडळात १४५ शेतकऱ्यांना ११ लाख ९२ हजार रुपये, पिंपरणे महसूल मंडळात ९० शेतकऱ्यांना ३ लाख ९९ हजार रुपये, शिबलापूर महसूल मंडळात २१८ शेतकऱ्यांना ६ लाख ७७ हजार रुपये प्रज्ञपत झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...