आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:मुळा उजवा कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटी

सोनईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुळा धरणाचा ५२ किमी लांबीचा मुख्य उजवा कालवा, ३० किमी लांबी असलेल्या ४ उपशाखा व त्या अंतर्गत येणाऱ्या १५ ते २० किमीच्या वितरीका यांसाठी मुख्य उजवा कालवा हेड टू टेल दुरुस्ती,शाखा व वितरीका दुरुस्ती ,जुने बांधकाम दुरुस्ती,भराव मजबुतीकरण,आवश्यक त्या ठिकाणी अस्तरीकरण या कामासाठी ७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

नेवासे, राहुरी, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतकरी, जनतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुळा धरणावरील मुख्य कालवा, शाखा कालवा व त्यावरील वितरिका यांची अवस्था खराब झाली होती. त्यामुळे रोटेशन कालावधीत पाणी वेळेवर मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे शेतकरी बांधवांची रोटेशन कालावधीत पाण्याची मोठी गैरसोय होत होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती आ शंकरराव गडाख यांनी दिली. आमदार शंकरराव गडाख म्हणाले, शेतकरी बांधवांची गेल्या अनेक वर्षांपासून मुळा उजवा कालवा, शाखा व मुख्य वितरीका यांची दुरुस्ती व्हावी ही मागणी होती.

अनेक वेळा चालू रोटेशमध्ये कालवा फुटणे,कालव्यास असलेली गळती, वितरिका यांची पाणी वाहून नेण्याची कमी झालेली क्षमता यामुळे रोटेशन वेळेवर होऊनही टेलपर्यत पाणी मिळण्यास अडचणी येत होत्या.मुळा उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे हेड टू टेल पाणी वेळेत मिळणार आहे,कालवे,शाखा व वितरीका यांमधून पाणी पूर्ण दाबाने जाईल व त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध होऊन पिके चांगली येण्यास उपयोग होणार आहे,अनावश्यक ठिकाणी होणारी पाण्याची गळती थांबेल त्यामुळे कमी कालावधीत रोटेशन होईल. हे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने व वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी स्वतः लक्ष घालून काम पूर्ण करणार आहे, असेही आमदार गडाख म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...