आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा:मिरवणुकांत उधळला ७५० गोणी गुलाल; ५ हजार किलो मिठाईचा प्रसाद

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला आहे. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशे अन् गुलालाची मोठी उधळन करत गणेश भक्तांनी जल्लोष केला. नगर शहरात दहा दिवसांत सुमारे ५ हजार किलो मिठाईच्या प्रसादाची विक्री झाली. तर लहान-मोठ्या मंडळांनी सुमारे ७५० गोणी गुलालाची उधळण केली. मागील दोन वर्षांच्या तुलनेत गुलालाच्या मागणीत घट झाल्याचे गुलाल होलसेलरकडून सांगण्यात आले.

नगर शहरात जल्लोषात उत्सव साजरा करण्यात आला. मिठाई व्यावसायिकांनी खव्याचे मोदक, मलई मोदक, काजू, चाॅकलेट आदी २५ प्रकारातील मोदक विक्रीसाठी ठेवले होते. खव्याचे मोदक ४८० रूपये प्रतिकिलो तर ड्रायफ्रुट मोदक १ हजार २०० रूपये किलो दराने विकला गेला. शहरात मिठाई विक्रेत्यांची लहान मोठी सुमारे ५० दुकाने आहेत. गणेशोत्सव कालावधीत प्रसादाच्या मोदकासह इतर मिठाई विक्रीत सुमारे २५ लाखांची उलाढाल झाल्याचा मिठाईचे पारंपरिक व्यावसायिक गोविंद जोशी यांनी वर्तवला जात आहे.

शहरातील प्रमुख तीन ते चार विक्रेते असून ७५० गोणी गुलाल विक्री झाल्याचा अंदाज संबंधित व्यावसायिकाने वर्तवला. परंतु, ही विक्री मागील दोन वर्षांच्या तुलनेत कमी असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षे कोरोनामुळे हातावर पोट असलेले बँड पथकांनाही या उत्सवात रोजगार उपलब्ध झाला. नगर शहरात प्रसिद्ध १० ते १२ पथक असून त्यावर सुमारे २०० कलावंतांचे पोट अवलंबून आहे. यंदा शहरात सनई चौघड्यासह बँड पथकाला मागणी होती, अशी माहिती प्रभात बँडचे प्रकाश राऊत यांनी दिली.

२० किलोची गुलाल गोणी १२५ रूपयांत
गुलाल शहर व जिल्ह्यातील कारखान्यात तयार होतो, तसेच तो इतर जिल्ह्यांतूनही आणला जातो. गुलालासाठी कोणी ठोस एजंट नाही.२० किलो गुलालाची गोणी १२५ ते १५० रूपयांना विकली जाते. शहरात यंदा सुमारे ७५० ते १ हजार गोणी विकल्याचा दावा होत आहे. त्यानुसार सुमारे दिड लाखांची उलाढाल झाली. दहा वर्षांपूर्वी ही उलाढाल दुप्पट होती.

गुलालाची उधळण कमी जागृती जास्त
गुलालालाला दोन ते तीन वर्षांपूर्वी असलेली मागणी व यंदाच्या उत्सवात असलेली मागणी यात मोठी तफावत आहे. यंदा विविध ठिकाणी सुमारे साडे सातशे ते एक हजार गोणी गुलाल विक्री झाल्याचा अंदाज आहे. मागील दहा वर्षांत, मंडळांमध्ये जागृती वाढत असल्याने, गुलालाच्या मागणीत घट झाली.''
राजेंद्र कटारिया, व्यापारी.

बातम्या आणखी आहेत...