आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळिंबाला 220 रुपयांपर्यंत मिळाला भाव:राहाता बाजार समितीत 18 हजार 764 कांदा गोण्यांची आवक, 1600 रुपयांपर्यंत मिळाला भाव

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (6 सप्टेंबर) कांद्यासह विविध शेतमालांची आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक 18 हजार 764 कांदा गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. सायंकाळी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला सर्वाधिक प्रतिक्विंटल 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. तर दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 750 ते 1150 रुपये भाव मिळाला, अशी माहिती राहाता बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

नगर जिल्ह्यात नाशिकनंतर सर्वाधिक कांदा लागवड केली जाते. उसानंतर कांदा व डाळिंब ही शेतकऱ्याची प्रमुख पिके आहेत. त्यामुळे साखर कारखानदारीसह कांदा व डाळिंबाच्या उत्पादनासाठी नगर जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज विविध शेतमालांचे लिलाव होतात. मंगळवारी राहाता बाजार समितीत 18 हजार 764 कांदा गोण्यांची आवक झाली होती. यावेळी झालेल्या कांदा लिलावात एक नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 750 ते 1150 रुपये, तीन नंबरच्या कांद्याला प्रतिक्विंटल 300 ते 700 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला प्रतिक्विंटल 550 ते 850 रुपये, तर जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.

नगर जिल्ह्यात विविध फळबागांखालील क्षेत्र 76 हजार 172 हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक 37 हजार 677 हेक्टर क्षेत्र डाळिंब बागांखालील आहे. राहाता बाजार समितीत शनिवार वगळता दररोज डाळिंबाचे लिलाव होतात.

डाळिंबाला 220 रुपयांपर्यंत मिळाला भाव

राहाता बाजार समितीत मंगळवारी शेतकऱ्यांनी 9 हजार 181 क्रेट डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यावेळी झालेल्या लिलावात एक नंबर डाळिंबाला प्रतिकिलो सर्वाधिक 126 रुपये ते 220 रुपये भाव मिळाला. दोन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 81 ते 125 रुपये, तीन नंबरच्या डाळिंबांना प्रतिकिलो 41 ते 80 रुपये, तर चार नंबर दर्जाच्या डाळिंबांना प्रतिकिलो 10 ते 40 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

सोयाबीनच्या भावात घसरण

राहाता बाजार समितीत मंगळवारी विविध शेतमालाचीही आवक झाली होती. यावेळी 33 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. सोयाबीनच्या भावात घट झाली असून सोयाबीनला किमान प्रतिक्विंटल 4643 ते कमाल 5179 रुपये भाव मिळाला. गव्हाला प्रतिक्विंटल 2360 रुपये भाव मिळाला. मकाला प्रतिक्विंटल 2586 रुपये भाव मिळाला. बाजरीची 27 क्विंटल आवक झाली होती. यावेळी बाजरीला प्रतिक्विंटल 2430 ते 2467 रुपये भाव मिळाला.

बातम्या आणखी आहेत...