आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जत येथे प्रतीक ऊर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर झालेल्या हल्लाप्रकरणी रविवारी आणखी ८ आरोपींना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता १४ झाली आहे. चौकशी झाल्यानंतर या प्रकरणाची योग्य माहिती देण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मोबाइलवर ‘आय सपोर्ट’ नूपुर शर्माचे स्टेटस ठेवतो, असे म्हणून ‘तुझा आम्ही उमेश कोल्हे करू,’ असे म्हणत पवार यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची फिर्याद अमित राजेंद्र माने यांनी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात सोहेल शौकत पठाण (२८, रा. लोहारगल्ली, कर्जत), अबरार ऊर्फ अरबाज कासम पठाण (२५, रा. लोहारगल्ली, कर्जत), जुनैद जावेद पठाण (१९, रा. पोस्ट ऑफिसमागे, कर्जत), हुसेन कासम शेख (४०, रा. पिंपळे गुरव, कासिद बिल्डिंग, पुणे), अरबाज अजीज शेख (२४, रा. पारगाव, ता. दौंड) व एक अल्पवयीन अशा ६ जणांना यापूर्वीच अटक केली आहे. त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आता रविवारी आणखी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये शाहरुख आरिफ पठाण (२८, रा. लोहारगल्ली कर्जत), इलाई महबूब शेख (२०, रा. लोहारगल्ली कर्जत), आकिब कुदरत सय्यद (२४, रा. हनुमानगल्ली, कर्जत), टिपू सरिम पठाण (१८, रा. लोहारगल्ली, ता. कर्जत), साहिल शौकत पठाण (२३, रा. लोहारगल्ली, कर्जत), हर्षद शरीफ पठाण (२०, रा. लोहारगल्ली, कर्जत), निहाल इब्राहिम पठाण (२०, रा. हनुमान गल्ली, कर्जत) व एक अल्पवयीन अशी आरोपींची नावे आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव करत आहेत. याप्रकरणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी माेर्चा देखील काढला होता. संवेदनशील मुद्दा म्हणून हे प्रकरण पोलिस हाताळत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.