आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:अकोल्यात 11 ग्रामपंचायतीत 80 टक्के शांततेत मतदान

अकोले2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी रविवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले. शिळवंडी व सोमलवाडी ग्रामपंचायतच्या निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाल्या. उर्वरित ९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी डिसेंबर मतदान होऊन उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले. अकोले तहसीलदार कार्यालयात मंगळवारी (२० डिसेंबर) मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील.

या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी २५ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. सरपंचपदासाठी सोमलवाडी व शिळवंडी ग्रामपंचायत बिनविरोध पार पडल्या आहेत. तर ४१ जण ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या शेंडी ग्रामपंचायत आणि गुहिरे ग्रामपंचायतीत सदस्य पदाच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...