आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:नगर -मनमाड रस्ता कामासाठी 800 कोटींचा निधी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या अहमदनगर - मनमाड मार्गाच्या कामासाठी नव्याने केंद्र सरकारने ८०० कोटींचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.

नगर -मनमाड या मार्गाच्या कामासाठी नव्याने हा आठशे कोटीचा निधी केंद्राने मंजूर केला अाहे. जानेवारी महिन्यात या मार्गाच्या कामाला सुरुवात होईल, असे डॉ. विखे यांनी सांगितले. या मार्गाच्या कामासाठी निधी मिळावा तसेच निविदा प्रक्रिया तातडीने व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने नव्याने ८०० कोटीचा निधी या मार्गासाठी मंजूर केला. दरम्यान गेल्या तीन वर्षापासून नगर - मनमाड रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यापूर्वी नगर- मनमाड रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले होते. त्याने काम अर्धवट सोडले होते.

त्यामुळे नगरसह पुणे व दक्षिण भारतातून जाणाऱ्या भाविकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. विळद घाट ते सावळी विहीर असे ७५ किलोमीटरचे हे काम होते.त्यासाठी ३१७ कोटी रुपयांचा खर्च होणार होता २०२३ पर्यंत हा रस्ता पूर्ण होणार होता. मात्र कंत्राटदार आणि केवळ ७.५० टक्केच या रस्त्याचे काम करून सोडले होते. त्यानंतर नगर जिल्ह्यातील अकोले येथे दौऱ्यावर आलेले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १८ जूनला नगर- मनमाड रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला टर्मिनेट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी नव्याने प्रक्रिया सुरू झाली होती. गुणवत्ता पूर्ण कामासाठीच केंद्राने निधी मंजूर केला

अहमदनगर- मनमाड या मार्गाचे काम कमी कालावधीत आणि गुणवत्ता पूर्ण पध्दतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने या मार्गाकरीता ८०० कोटी रूपयांचा निधी केला असून, त्याची निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे, असे डॉ. विखे यांनी सांगितले.

नगर -मनमाड रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे केवळ प्रवासी वाहतूक या मार्गावरून सुरू आहे. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे पोलीस प्रशासनाने या मार्गावरून अवजड वाहतूक घेऊन जाण्यास मनाई केली होती. तसे आदेश पोलिस प्रशासनाने जारी केली होती. अवजड वाहतूक जाऊ नये म्हणून शेंडी व विळद घाट येथे वाहतूक पोलिस अवजड वाहतूक वळवत आहेत. पावसामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने तात्पुरती डागडुगीसाठी आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.त्यातून सध्या या मार्गाचे काम सुरू आहे. प्रत्यक्षात निविदा व अन्य प्रक्रियेनंतर या मार्गाचे काम सुरू होईल. ७५ किमी नगर- मनमाड रस्ता होण्यासाठी दोन वर्षे तरी लागतील.

बातम्या आणखी आहेत...