आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभव:शाळेतील भाजीबाजारात 81 हजारांची उलाढाल

जामखेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खर्डा येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुले, मुली व उर्दु यांचे वतीने विद्यार्थ्यांचा भाजीपाला बाजार भरवला. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन सरपंच आसाराम गोपालघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, प्रकाश गोलेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी लहान मुलांनी भाजीपाला, फळभाज्या, फळे, भेळ, चने, फुटाणे, इडली, आप्पे, पानीपुरी, पेन, बांगडया, स्टेशनरी साहित्यांचे दुकान मांडले होते. प्रत्येक मुलांची २५० रुपये ते २४०० रुपयापर्यंत विक्री झाली. एकूण ८१ हजार ७५० रूपयांची आजच्या बाजारात उलाढाल झाली.

मुलांना व्यवहार ज्ञान, स्वजबाबदारी, गणितीय क्रिया समजल्या. सर्व पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ, व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यानी मोलाचे सहकार्य केले. या भाजीबाजारास महालिंग कोरे, तुलसीदास गोपाळघरे, पत्रकार संतोष थोरात, दत्तराज पवार, किशोर दूशी, धनशिंग साळुंके,अनिल धोत्रे आदींनी भेट देऊन भाजीपाला खरेदी केला. याकामी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत गुरसाळी, अमोल नवले, प्रियंका मिसाल, संतोष पगारिया यानी सहकार्य केले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक राम निकम, मुख्याध्यापक बाबुराव गीते, समीना सय्यद, जानकिराम खामगल, दिनकर मोहळकर, चंद्रकांत अरण्ये, संतोष वहील, ज्योती रासकर, ज्योती ढवळशंख, श्रीहरी साबळे, अमोल घाटुळे, सय्यद, गोरे, सुवर्णा मानेकर, रत्नप्रभा शीरसाठ आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मुलींच्या जन्माचे स्वागत करा, स्री भ्रूण हत्या करू नका यासबंधी चित्राचे पोस्टर लावले होते. या कार्यक्रमास चोन्डेश्वरी तरुण मंडळाने सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...