आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:झेंडीगेट परिसरात 850 किलो गोमांस जप्त; एक जण ताब्यात, ‘स्थानिक गुन्हे’ची कारवाई

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोवंशीय जनावरांची कत्तल करून ते पिकअपमध्ये भरून विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांनी एकाला पकडले. मोहसीन मुसा शेख (वय ३२, रा. बारा इमाम, कोठला) असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून ८५० किलो गोमांस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी झेंडीगेट परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

शेख विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप घोडके यांनी फिर्याद दिली आहे. झेंडीगेट परिसरात मोहसीन शेख हा गोवंशीय जनावरांची कत्तल करून ते वाहनामध्ये भरून विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस अंमलदार भाऊसाहेब काळे, संदीप पवार, लक्ष्मण खोकले, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने झेंडीगेट परिसरात छापा टाकला.

बातम्या आणखी आहेत...