आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत बिनविरोध:ग्रामपंचायत निवडणुकीसाठी श्रीरामपूर तालुक्यात 89 उमेदवार

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या १८ तारखेला होत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील चार ग्रामपंचात निवडणूकीसाठी ५२ सदस्यपदासाठी एकूण ८० तर ४ सरपंच पदासाठी ९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात असून वांगी खुर्द व कमालपूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. खंडाळा येथे पाच प्रभाग असून १५ सदस्य आहेत तर सरपंच पद अनुसूचित जमाती स्त्री दाखल अर्ज खंडाळा सदस्य पदासाठी ३० व सरपंच पदासाठी २, उंबरगाव येथे तीन प्रभाग व नऊ सदस्य तर सरपंच पद सर्वसाधारण स्त्री उंबरगाव सदस्य पदासाठी १७, सरपंच पदासाठी २ अर्ज, माळेवाडी तीन प्रभाग सदस्य संख्या ७ तर सरपंचपद सर्वसाधारण स्त्री तर सदस्य पदासाठी १७ तर सरपंच पदासाठी २ अर्ज, वांगी बुद्रुक तीन प्रभाग व सात सदस्य संख्या सरपंचपद अनुसूचित स्त्री दाखल अर्ज सदस्यपदासाठी १४ सरपंच पदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. सदस्य पदासाठी १६३ पैकी ६९ जणांनी तर सरपंच पदासाठी ३८ पैकी २६ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत.

वांगी खुर्द तीन प्रभाग व सदस्य संख्या सात व सरपंचपद सर्वसाधारणसाठी राखीव आहे. सदस्य पदासाठी १४ तर सरपंच पदासाठी ३ अर्ज दाखल होते. इतर अर्ज माघार घेतल्याने ही निवडणूकही बिनविरोध झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...