आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याला प्रतिक्विंटल १३९७ भाव:कोपरगावात कांद्याची ८९६० क्विंटल आवक

काेपरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव बाजार समितीत बुधवारी खुल्या कांद्याला प्रतिक्विंटल १३९७ भाव मिळाला असून आवक ८ हजार ९६० क्विंटल एवढी झाली आहे. बाजार समितीत एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल ९९७ ते १०५० रुपये, नंबर २ कांद्याला ७५०-१०० रुपये, नंबर तीन कांद्याला प्रतिक्विंटल ७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाची आवक ८५६ क्रेटस झाली असून सर्वाधिक ११० प्रतिकिलो भाव मिळाला.

डाळींब नंबर १ ला ११० रुपये, डाळींब नंबर २ ला ९०-५५ डाळींब, नंबर ३ ला ५०-२५ किलो भाव मिळाला. तसेच भुसार या शेतीमालाचे बाजारभाव असा गहू कमाल बाजारभाव २४२५ व सरासरी २३८२भाव मिळाला. हरभरा कमाल बाजारभाव ४७५० व सरासरी ४६८० भाव मिळाला. सोयाबीन कमाल बाजारभाव ६०५० व सरासरी ५९६५ भाव मिळाला. मका कमाल बाजारभाव २४०१ भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक एन. जी. ठोंबळ यांनी दिली. शेतकरी प्रतवारी करून शेतमाल आणावा, असे आवाहन सचिव एन. एस. रणशूर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...