आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्‍कादायक:लष्करभरतीसाठी जाताना पिकअप उलटून 9 जखमी

पाटोदा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर जिल्ह्यातील कोळवाडीत येथून राहुरी येथे लष्करभरतीसाठी निघालेल्या २३ तरुणांचा पिकअप तालुक्यातील धनगर जवळकानजीक उतारावर उलटल्याने नऊ तरुण जखमी झाले. गुरुवारी (२५ ऑगस्ट) सकाळी ११.३०च्या सुमारास हा अपघात झाला. नगर जिल्ह्यातील राहुरी येथे सध्या लष्करभरती सुरू असुन यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील कोळवाडी येथील २३ तरुण(एमएच ०४ जीएफ ९९७०) या पिकअपने गुरुवारी सकाळी राहुरीकडे निघाले होते. तालुक्यातील चुंबळी फाटा परिसरातील धनगर जवळका गावानजीक उतारावर चालक शशिकांत शिरसाठ याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला. या अपघातात २३ पैकी एकूण नऊ तरुण जखमी झाले. जखमींना पाटोदा ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आले.

जखमी तरुणांची नावे अपघातात मोहन दहिफळे, ओंकार दहिफळे, सूरज दहिफळे, नानाजी दहिफळे, चालक शशिकांत शिरसाठ, ज्ञानेश्वर वनवे, राम तांदळे, नारायण दहिफळे, ज्ञानेश्वर केंद्रे हे तरुण जखमी झाले. ते सर्व कोळवाडीचे रहिवासी आहेत. त्यांना डोके, हात, पायास मार लागला आहे. राहुरीत पोहोचण्यापूर्वीच वाहनास अपघात झाल्याने तयारी केलेल्या तरुणांची लष्करभरतीची संधी हुकली आहे.

बातम्या आणखी आहेत...