आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दपार:6 महिन्यांत 9 सराईत गुन्हेगार हद्दपार ; तोफखाना पोलिसांचे प्रस्ताव मंजूर

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणार्‍या नऊ सराईत गुन्हेगारांविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यात नऊ आरोपींविरुध्द तोफखाना पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मंजुरी देत याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. हद्दपार केलेल्यांमध्ये श्रीपाद शंकर छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत शंकर छिंदम (दोघे रा. मोहनबाग, दिल्लीगेट), कलीम सलीम शेख (रा. रामचंद्र खुंट) व गौरव प्रभाकर साळवे (रा. निलक्रांती चौक), कुणाल ऊर्फ सनी अनिल कांबळे, गौरव राजेंद्र गायकवाड, अभिषेक ऊर्फ घार्‍या दिलीप लोणारे, अमोल हिरामण गायकवाड, स्वप्नील सुनील पारधी आदींचा समावेश आहे. या सराईत गुन्हेगारांविरूध्द तोफखाना ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळंके, विकास खंडागळे, विनोद गिरी यांनी परिश्रम घेतले.

हद्दपार आरोपी गजाआड महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ प्रमाणे जिल्ह्यातून १८ महिन्यांकरीता हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार गौरव राजेंद्र गायकवाड (वय २२, रा. निलक्रांती चौक) हा बुधवारी सायंकाळी निलक्रांती चौकात आढळून आल्याने तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरूध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार चेतन मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...