आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल हस्तगत:नऊशे किलो गांजासह दोन कोटींचा मुद्देमाल हस्तगत

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओरिसा राज्यातून नारळाच्या पोत्यामधून दडवून गांजा घेऊन नगरला येणाऱ्या टोळीला तेलंगणा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून नऊशे किलो गांजासह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती मूळचे नगर जिल्ह्यातील रहिवाशी, राचकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी दिली. यातील मुख्य आरोपी योगेश दत्तू गायकवाड (रा. संगमनेर) हा पसार आहे.

सोमवारी सकाळी तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली. एका ट्रकमधू नाराळाच्या पोत्यांमध्ये लपवून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना वाहन अडवून ही कारवाई केली. यामध्ये विकास बबन साळवे (रा. सुकेवाडी रोड, संगमनेर), विनोद चंद्रभान राळकर (रा. रांजणगाव देशमुख, कोपरगाव), किशोर तुळशीराम वाडेकर (संगमनेर) व कोसाचिट्टी बाबू (रा. ओरिसा) यांना अटक करण्यात आली. हे आरोपी ओरिसामधून हा गांजा नगर जिल्ह्यात घेऊन येत होते. त्यांनी यापूर्वीही असे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

बातम्या आणखी आहेत...