आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात ९२ वर्षाच्या आजीबाई हसीनाबी मोहम्मद सय्यद यांना नवदृष्टी मिळाली. त्यांना स्पष्ट दिसू लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. फिनिक्स फाऊंडेशनने माणुसकीच्या भावनेतून राबविलेल्या उपक्रमातून आजीबाईंना मिळालेली नवदृष्टी सर्वांनाच भावली.
नागरदेवळे नुकतेच नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. काचबिंदू, मधुमेह व उच्च रक्तदाबाने एक डोळा गमावलेल्या कोठला येथील हसीनाबी यांना दुसर्या डोळ्याने देखील दिसत नसल्याने त्या मोठ्या आशेने शिबिरात दाखल झाल्या. त्यांच्या डोळ्यातील पडद्याला छिद्र असल्याचे निदान झाले. त्यांचे वय व प्रकृतीमुळे ही शस्त्रक्रिया करणे अडचणीचे झाले होते.
मात्र, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी पुणे येथील नेत्रतज्ञ डॉ. रितेश शहा यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगत डोळ्याची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली.डॉ. शहा यांनी हसीनाबी यांच्यावर ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रिया होवून हसीनाबी या शहरात परतल्या असता, त्यांनी जालिंदर बोरुडे यांना जवळ घेऊन त्यांना भरभरुन आशीर्वाद दिले. या शिबिरात इतर ज्येष्ठ नागरिकांवर देखील मोतीबिंदू व काचबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.