आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराचे ग्रामदैवत श्रीमोहिनीराज महाराज यात्रोत्सवाचे भागवत दीपोत्सवामध्ये विक्रमी साडेनऊशे समयांचा सहभाग होता. श्रीविष्णूच्या मोहिनी अवताराचे जगातील एकमेव मंदिर नेवासे येथे आहे. हे देवस्थान कुलदैवत म्हणून जगभरातून भाविक माहीपौर्णिमेदरम्यान यात्रेच्या दरम्यान दर्शनासाठी येत असतात. रथसप्तमीपासून पंधरा दिवस चालत असलेल्या या यात्रा महोत्सवामध्ये सर्वात प्रथम मोहिनीराज देवासमोर भागवत कथा व निरूपण होत असते.
या दरम्यान भागवताच्या व्यासपीठापासून देवाच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत दुतर्फा आठ दिवस शेकडो समया अखंड तेवत असतात. यावर्षी विक्रमी संख्येने समया लावण्यात आलेले आहेत. परिसरातील प्रत्येक कुटुंबातून एक समयी आणून गाभाऱ्यामध्ये ठेवली जाते. भागवत पारायण संपूर्ण होईपर्यंत या समया येणाऱ्या प्रत्येक भाविक पेटत्या ठेवण्याचा उपक्रम करीत असतो.
येणारा प्रत्येक भाविक या समयांमध्ये तेलही घालत असतो. २८ जानेवारीपासून ४ फेब्रुवारीपर्यंत सदरच्या समया देवाचे गाभारा उजळत होत्या. यावर्षी ललिता देवी संस्थानचे धनंजय महाराज यांच्या भागवताचा लाभ नेवासकरांना मिळाला. सकाळी मंदिरामध्ये संहिता वाचन होत असे व दुपारी मंदिरासमोरच्या भव्य मंडपामध्ये भागवत निरूपण होत असे. यात्रा महोत्सवाचा हा टप्पा संपल्यानंतर रविवारी रात्री मोहिनी माय देवीचा भळंदाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी सामुदायिक गीतापठण आणि विष्णुसहस्रनामाचे वाचन होणार आहे. रात्री चंद्रोदय होताच पेटते पलिते व माठाच्या मध्ये असलेल्या पेटते निखाऱ्यासह वडाळा महादेव येथील देवीभक्त रेवणनाथ महाराज हे पारंपरिक भळंद खेळणार आहेत. देवीचा जागर करणार आहेत. रात्री सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविक गर्दी करत असतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.