आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:नगरमध्ये 960 किमी सायकलस्वारी करत दिला सुदृढ आरोग्याचा नारा; अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनचा उपक्रम

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सायकल चालवा, आरोग्य टिकवा, देखना है कल, तो चलाव सायकल!, भारत माता की जय, या घोषणा देत नगर शहरातील विविध रस्त्यांवर २९ सायकलस्वारांनी सात दिवसांत ९६० किमींचा प्रवास करून सुदृढ आरोग्य आिण पर्यावरण संवर्धनाचा नारा दिला. निमित्त होते अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनच्या ‘नाईट राईड’चे.१ ते ७ मे या कालावधीत अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशनने सायकल बद्दल जन जागृती करण्यासाठी या राईडचे आयोजन केले होते. या सायकलस्वारीला (नाईट राईड) प्रोफेसर काॅलनी चौकातून दररोज रात्री ९ वाजता सुरुवात व्हायची, दोन तास ही राईड चालायची.

या राईडदरम्यान या सायकलस्वारीत सहभागी २९ सायकलस्वारांनी विशाल गणपती, केडगाव देवी, विजय हनुमान या मंदिरांना भेटी दिल्या. कुष्ठधाम रोड, पाइपलाइन रोड, बालिकाश्रम रोड, दिल्लीगेट, समई चौक, अब्दुल कलाम चौक, स्टेशन रोड, कोठी रोड अशा सर्व भागात फिरुन सायकल चालवण्याबाबात जनजागृती केली. या सात दिवसांच्या कालावधीत या २९ सायकलस्वारांनी शहरात सुमारे ९६० किमीचा प्रवास केला.

नियमित सायकलिंगमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते
नियमित सायकलिंगमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि पर्यायाने फुफ्फुसे, हृदयाच्या आजारांच्या शक्यता फार कमी होतात. मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार सहज नियंत्रणात राहतात. कारण, यात पायापासून हृदयापर्यंत रक्ताचं वहन वाढतं आणि रक्तपुरवठा सुरळीत राहतो. सायकल चालवण्यामुळे भूक चांगली लागते आणि पचनसंस्था सुधारते.''
चंद्रशेखर मुळे, अध्यक्ष अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन.

बातम्या आणखी आहेत...