आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशोभीकरण:प्रोफेसर चौकात 18.3 फुटांच्या चौथऱ्यावर‎ संभाजी महाराजांचा 12 फूट उंचीचा पुतळा‎, चौथऱ्याच्या बाजूने उद्यान करणार

प्रतिनिधी | नगर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात‎ प्रस्तावित असलेला छत्रपती संभाजी महाराजाओं‎ पुतळा १८.३ फूट उंच चौथऱ्यावर उभारण्यात येणार‎ आहे. या कामाच्या २९ लाख रुपये खर्चाच्या निविदेला मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. किल्ल्याच्या बुरुजाची प्रतिकृती असणाऱ्या या चौथऱ्यावर‎ महाराजाओं १२ फूट उंचीचा पुतळा बसविण्यात येणार आहे. दरम्यान, या चौथऱ्याच्या दोन्ही बाजूंनी २७ ते ३० मीटरपर्यंत गार्डन, पाथ वे करून सुशोभीकरण‎ करण्यात येणार आहे.‎

स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत या कामाला मंजुरी‎ देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासूनचा पुतळा उभारणीची प्रलंबित मागणी आता पूर्ण होण्याच्या‎ मार्गावर आहे. तत्कालीन नगरपालिका काळात हा‎ पुतळा नेप्ती चौकात प्रस्तावित होता. मात्र, राष्ट्रीय‎ महामार्ग झाल्याने तो प्रोफेसर कॉलनी चौकात‎ बसवण्याचा निर्णय झाला. त्याला पोलिसांकडून‎ परवानगी न मिळाल्याने चौकातील रस्त्याऐवजी‎ चौकाच सध्याच्या व्यापारी संकुलाच्या मोकळ्या‎ जागेत बसवण्याचा निर्णय झाला. त्याला जिल्हास्तरीय‎ समितीकडून व पोलिस प्रशासनाने परवानगी दिली‎ आहे. शासनाच्या कला संचालनालयाच्या मुख्य वास्तू‎ विशारदांनीही मंजुरी दिल्याचे अभियंता मनोज पारखे‎ यांनी सभेत सांगितले.‎

पुतळा उभारणीला‎ १५ वर्षानंतर मुहूर्त!‎

छत्रपती संभाजी महाराजाओं हा १२‎ फूट उंचीचा पुतळा अनेक‎ वर्षांपासून तयार आहे. गेल्या १५‎ वर्षांपासून या पुतळ्याच्या‎ उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत.‎ पुतळा तयार करणाऱ्या पुणे येथील‎ परदेशी नामक शिल्पकारास निम्मे‎ देयकेही अदा झालेले होते. मात्र,‎ जागा निश्चित नसल्याने‎ महापालिकेने हा पुतळा ताब्यात‎ घेतला नव्हता. आता १५ वर्षांनंतर‎ या पुतळ्याच्या उभारणीचा प्रश्न‎ मार्गी लागणार आहे.‎

स्थायी समितीच्या सभेत मिळाली चौथऱ्याच्या कामाला मंजुरी‎

नगर विकास विभागाची‎ अंतिम मंजुरी प्रलंबित!‎ महाराजांचा पुतळा व चौथऱ्याच्या‎ उभारणीस जिल्हाधिकाऱ्यांच्या‎ अध्यक्षतेखालील समिती, पोलिस‎ प्रशासन व राज्याच्या कला‎ संचालनालयानेही मंजुरी दिली आहे.‎ मात्र, पुतळा उभारणीच्या कामास‎ नगर विकास विभागाची परवानगी‎ अद्याप आलेली नसल्याची माहिती‎ मनपा प्रशासनाकडून सभेत देण्यात‎ आली. त्यामुळे चौथरा व उद्यानाचे‎ काम सुरू होणार असले तरी, प्रत्यक्ष‎ पुतळा बसविण्यापूर्वी शासनाची‎ मंजुरी घ्यावी लागणार आहे.‎