आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिरूर कासार:100 वर्षांच्या वडिलांसाठी 65 वर्षीय मुलाची पायपीट, खांद्यावर घेऊन 7 किलोमीटर पायी चालत दवाखाना गाठला

शिरूर कासार (युवराज सोनवणे)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडील आजारी, कोरोनाच्या भीतीमुळे लोकांचा वाहन देण्यास नकार

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गावात बस येत नाही, गावातील लोक तालुक्याच्या ठिकाणी जातात, पण वडील आजारी असल्याने कोरोनाच्या भीतीने त्यांना कोणी दुसऱ्या वाहनात घेऊन जायला तयार नाही. स्वत:कडे दुचाकी नाही, लोकांना नेहमीच दुचाकी कशी मागावी अशा अडचणीवर मात करत नवनाथ रावसाहेब यादव या ६५ वर्षांच्या मुलाने आपल्या शंभर वर्षांचे आजारी वडील रावसाहेब यांना शनिवारी उपचारासाठी चक्क खांद्यावर घेऊन ७ किलोमीटर पायी चालत दवाखाना गाठला. दवाखान्यात वडिलांवर उपचार करून पुन्हा घरी आणल्याची घटना शिरूर तालुक्यातील झापेवाडी गावात समोर आली आहे.

शनिवारी रावसाहेब यादव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. परंतु, लॉकडाऊनमुळे गावात बस येत नाही आणि कोरोनाच्या भीतीमुळे गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या वाहनात कोणी घेऊन जायला तयार नाही. आणि स्वत:कडे दुचाकी नाही, कुटुंबात दोन मुले असली तरी ती शेतीच्या कामात गुंतली होती. अशा अडचणींमुळे नवनाथ यांनी वडिलांना शिरूर येथे उपचारासाठी स्वत:च्या खांद्यावर उचलून नेले. या घटनेमुळे मात्र समाजमन सुन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...