आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:जलजीवनच्या वॉररूम कक्षातील वर्दळीला ब्रेक; जिल्हा परिषदेने कक्षाबाहेर नेमला स्वतंत्र कर्मचारी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत जलजीवन मिशनच्या कामाला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून जलजीवन वॉर रूम कक्ष सुरू करण्यात आला. सर्व फाईल याच कक्षात असताना, ठेकेदारांची वर्दळ या कक्षात वाढल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेने कक्षाबाहेर एक स्वतंत्र कर्मचारी नेमला आहे.

जिल्हा परिषदेत जलजीवन मिशनचे काम सुरू आहे. राज्य व केंद्र सरकारचे या महत्वपूर्ण अभियानाकडे लक्ष असून नियमीत व्हिसीद्वारे योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जातो. इतर खाते प्रमुखांकडे स्वाक्षरीसाठी फाईल पाठवल्या जात होत्या, त्यामुळे एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल पाठवण्यातच अधिक वेळ जात होता. यापार्श्वभूमीवर मुख्यकार्यकारी अधिकारी येरेकर यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाशेजारीच वॉर रूम सुरू केली. आता जलजीवनच्या सर्व फाईलवर याच कक्षात कामकाज चालते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर विभागप्रमुखांकडे आता फाईल पाठवली जात नाही, तर ते अधिकारीच या वॉर रूममध्ये जाऊन आवश्यक तेथे स्वाक्षरी करतात. परंतु, या कक्षात ठेकेदारांनी जाण्याची आवश्यकता नाही, परंतु, ठेकेदारांची वर्दळ वाढल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. याबाबत ३१ ऑगस्टला ‘दिव्य मराठी’त वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत, जिल्हा परिषदेने या वॉर रूम कक्षाबाहेर एक कर्मचारी नेमून प्रशासकीय यंत्रणेव्यतिरिक्त इतरांना जाण्यास प्रतिबंध घातला आहे.

बातम्या आणखी आहेत...