आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत मोदी सरकार दुप्पट करणार होते. प्रत्यक्षातउत्पादनातूनयेणाऱ्या शेतीउत्पन्नात घटझाली. सरकारीआकडेवारीनुसार पिकापासून शेतकऱ्यांना येणारे उत्पन्न प्रतिदिन केवळ २७ रुपयांवर आले. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले गेल्याने शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढतो आहे. परिणामी मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आकडा ३ लाख २५ हजारांपर्यंत पोहाेचला. अशा पार्श्वभूमीवर मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशा तरतुदी न केल्याने शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
श्रमिकांची क्रयशक्ती वाढवण्याऐवजी अर्थसंकल्पात पुन्हा एकदा कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी दिली.
नवले म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीमालाला दीडपट भावाचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. अर्थसंकल्पात याबाबत पाळलेले मौन शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. शेतीमालाला रास्त भाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकरीपूरक पीक विमा योजना, आपत्ती काळात नुकसान भरपाई या मूळ मुद्यांना बगल देऊन केलेल्या या घोषणा शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी अक्षम आहेत. भरड धान्याला श्रीधान्य म्हणल्याने नव्हे, भरड धान्याला रास्त भाव दिल्याने खऱ्या अर्थाने भरड धान्याला प्रोत्साहन मिळले, हे वास्तव नाकारले जात आहे.
बाजरीला २२५० रुपये, तर ज्वारीला २६२० रुपये इतका तुटपुंजा आधारभाव दिल्याने मागील वर्षी शेतकरी भरड धान्यापासून दूर गेले. कापसाचे व सोयाबीनचे, नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटले असताना शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात पावले उचलण्याची अपेक्षा होती. मात्र तसे झालेले नाही. देशाची साखरेची वार्षिक मागणी २७५ लाख टन असताना सुरू असलेल्या हंगामात ३९० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. मागील हंगामातील उर्वरित साखर पाहता अतिरिक्त उत्पादनामुळे उसाला एफआरपी देता येणे कारखान्यांना अशक्य होणार आहे.
सिंचन व शेतीला वीजपुरवठ्याबाबतही दुर्लक्ष
दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगची मागणी करत आहेत. अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. गोवर्धन योजनेत १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली. दुधाला भाव न देता गोवर्धन कसे करणार हे मात्र स्पष्ट केलेले नाही. देशाची गरज भागवण्यासाठी आजही आपल्याला १ लाख १७ हजार कोटी रुपये किमतीचे खाद्यतेल दरवर्षी आयात करावे लागते. देशाला खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर करण्यासाठी मोठी उपाययोजना अपेक्षित होती. अर्थसंकल्पात याबाबत गांभीर्याने तरतूद करण्याचे टाळले. सिंचन व शेतीला वीज पुरवठ्याबाबत केलेले दुर्लक्ष क्लेशदायक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.