आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक परिस्थिती व अर्थकारणाचे तसेच देशांतर्गत वास्तवाचे भान ठेवून कोठे वाहून न जाता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत. वास्तवाचे भान ठेवून विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिक्रिया सीए अशोक पितळे यांनी दिली. सीए पितळे म्हणाले, भांडवली गुंतवणूक दहा लाख कोटी तसेच रेल्वे, वाहतुकीचे वेगवेगळे प्रकल्प नवीन विमानतळे, बंदरे यांच्या निर्मितीसाठी देखील मोठी तरतूद करून अर्थमंत्री रोजगार निर्मिती व सर्वसमावेशक आर्थिक विकास साधण्याच्या उद्देशाकडे झेप घेतली आहे.
नवीन आयकर प्रणाली प्रमाणे ७ लाख पर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागणार नाही. आयकर दरांच्या राशीत बदल करून मध्यमवर्गाला नोकरदारांना काय करात मोठा दिलासा दिला आहे. सूक्ष्म व लहान उद्योग घटकांना त्यांचे पैसे वेळेवर मिळवण्याच्या दृष्टीने कमी व्याज दराने व जास्तीचे तारण न घेता कर्ज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.सन २०२३-२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था २.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आयएफएमने व्यक्त व्यक्त केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या अर्थव्यवस्था ६.५ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज अतिशय उत्साहवर्धक आहे, असेही सीए पितळे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.