आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:वांबोरी घाटात आढळला युवकाचा जळालेला मृतदेह

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वांबोरी घाट परिसरात रस्त्यालगत आतील बाजूस एका अंदाजे १८ ते २० वर्षे वयाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या युवकाचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवला आहे.

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे १८ ते २० वर्षे वय असलेल्या युवकाचा मृतदेह बॅगेसह जाळून टाकण्यात आल्याचे आढळून आले. खाजगी रुग्णवाहिकेतून हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या युवकाचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठवला आहे.

दरम्यान, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तपासासाठी पथकही रवाना करण्यात आले आहे. एलसीबी व एमआयडीसी पोलिस संयुक्तपणे तपास करत आहेत. या रस्त्यावरील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.

युवक नगरचा की औरंगाबादचा?
नगर - औरंगाबाद महामार्गापासून जवळच रस्त्यालगत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. युवकाला मारून त्याला बॅगेत टाकले व ती बॅग रस्त्यालगत झुडपात टाकून जाळण्यात आली, असा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. मात्र, रस्त्यालगत मृतदेह आढळल्याने हा युवक नगरचा आहे की औरंगाबाद अथवा इतर जिल्ह्यातला, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...