आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रस्ता अपघातात जामखेड येथील व्यापाऱ्याचा मृत्यू

जामखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान येथून देवदर्शन करून जामखेडकडे परतणाऱ्या जामखेड शहरातील भांड्याचे व्यापारी महेंद्र बोरा यांचे चारचाकी वाहन नगर जामखेड रोडवरील पोखरीजवळ आल्यानंतर कार पुलाच्या खाली गेल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या समवेत असलेले कुटुंबातील तीन जण या अपघातात जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. जामखेडचे व्यापारी महेंद्र बोरा, वय ५८ हे काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत राजस्थान येथे देवदर्शनाला गेले होते. ते रात्री विमानाने पुणे येथे आल्यानंतर त्यांच्या चारचाकी गाडीने एमएच १६ एटी ८८०७ सर्व आपल्या कुटुंबासमवेत पुण्याहून पहाटे जामखेडकडे निघाले होते. त्यांची गाडी २ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास नगर-जामखेड रोडवरील पोखरी फाट्याजवळ आली होती. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या पुलावरून चारचाकी गाडी पलटी होऊन भीषण अपघात झाला. यात महेंद्र बोरा यांचा मृत्यू झाला. पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय ५२, सून जागृती भूषण बोरा, वय २८, नात लियाशा भूषण बोरा, वय ६ हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. तर त्यांचा मुलगा भुषण शांतिलाल बोरा, वय ३४ हा कीरकोळ जखमी असल्याने त्याच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. मृत महेंद्र बोरा हे व्यापारी जितेंद्र बोरा यांचे बंधू होते. घटनास्थळी आष्टीचे सहायक पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, भरत गुज्जर, बी. ए. वाणी यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनेची माहिती समजतात जामखेड इथून माजी सरपंच सुनील कोठारी, शुभम बोरा, हर्षल कोठारी, संदेश कोठारी, निखिल बोथरा, निखिल भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...