आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापारंपरिक शिक्षण पद्धती दिवसेंदिवस कालबाह्य होत आहे. कौशल्याधिष्ठीत, व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू करण्यासाठी नव्या केंद्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी केले. संस्थेने आपल्या विविध महाविद्यालयांमध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षित असलेलेले व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू केले असल्याचे झावरे म्हणाले.
पारनेर महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. टी. जी. महाविद्यालयाचे (खडकी, पुणे) प्राचार्य डॉ. संजय चाकणे, भारत सरकार युवा प्रतिभा पुरस्कार विजेते योगेश चिकटगावकर, प्राचार्य. डॉ. रंगनाथ आहेर, कार्यक्रमाचे संयोजन कार्याध्यक्ष डॉ. संजय गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे आदी उपस्थित होते.
माजी आमदार झावरे म्हणाले, इतिहास, भूगोल आदी विषयात प्राप्त केलेल्या पदव्यांचा व्यावहारिक पातळीवर कोणताही उपयोग होत नाही. वाणीज्य शाखेतील पदवीधराला बँकेत खाते उघडण्याचा अर्ज भरता येत नाही. हे पारंपरिक शिक्षण पद्धतीचे अपयश असल्याची खंत झावरे यांनी व्यक्त केली. डॉ. संजय चाकणे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चौकटीबाहेरील शिक्षणाला अधिक महत्त्व आहे.
कॉलेज कट्टा ही संकल्पना चांगल्या पद्धतीने राबवायला हवी. जीवन सुंदर आहे ते आनंदाने जगा. खूप वाचा, लिहा असे आवाहन डॉ. चाकणे यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉ. भाऊसाहेब शेळके, कार्यालयीन अधीक्षक सावकार काकडे, प्रा. गंगाराम खोडदे, पर्यवेक्षक प्रा. संजय कोल्हे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांच्यासह प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले. उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी आभार मानले. डॉ. हरेश शेळके, डॉ. माया लहारे, प्रा. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, अभिनेते मिलिंद शिंदे म्हणाले, मुंबई, पुण्याबाहेरचे अभिनेते घडू शकत नाहीत, हा काही लोकांचा भ्रम होता. तो माझ्यासारख्यांनी दिल्ली, पुण्यात अभिनयाचे धडे घेऊन तो गैरसमज दूर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.