आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी नंबर:लाच मागितल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रद्द झालेला जीएसटी नंबर पुन्हा कार्यान्वित करून देण्यासाठी व्यवसायिकाकडे चार हजार रूपये लाचेची मागणी करणार्‍या वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर अधिकाऱ्यावर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारिका जयवंत निकम (वय ३९) असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ही कारवाई केली. पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील व्यवसायिकाने तक्रार दिली होती. पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, अंमलदार चौधरी, सचिन सुद्रुक, राधा खेमनर, संध्या म्हस्के, तागड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...