आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:तरुणाच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

श्रीगोंदे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोळगाव येथील सोमनाथ विठठल मेहेत्रे या ४६ वर्षाच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन श्रीगोंदे पोलिसांनी, डॉक्टरांनी दिलेले अहवाल आणि साक्षीअंती पोलिसांनी तपास करत पोलिस उपनिरीक्षक अमित माळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.कोळगाव येथील सोमनाथ मेहेत्रे याचा मृतदेह भानगाव शिवारात गोरेमळा जवळ असलेल्या फॉरेस्ट गट नं ६३२ मध्ये आढळून आला.

त्यामुळे भाऊ अशोक मेहेत्रे याच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपास करत असताना पोलिसांनी परमेश्वर रघुनाथ गोरे, रामकृष्ण भास्कर गोरे, दादा ज्ञानदेव गोरे, सर्व रा. गोरेमळा, भानगाव, कृष्णा नाना गायकवाड, वनरक्षक, रा. मांडवगण, मनोज महादेव मदने, सावता धोंडीबा मेहेत्रे, संतोष धोंडीबा मेहेत्रे, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदे, शरद सोनबा इंगळे, रा. इंगळेवस्ती, पिसोरेखांड, ता. श्रीगोंदे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ए. एच. मुजावर यांनी मयतास झालेल्या जखमा टणक व कठीण वस्तुने झाल्याचे सांगितले.अपघातात अशा जखमा होण्याची शक्यता कमी असल्याचा लेखी अहवाल दिल्याने मयतास अज्ञात इसमाने मयताचे डोक्यावर काहीतरी टनक व कठीन वस्तुने मारहाण केल्याचा संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...