आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना धमकी देणाऱ्या चार शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोले6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्रमशाळेतील शिक्षकांकडूनच मुख्यध्यापकांना दमबाजी करून मारहाण करण्याची धमकी देण्यात आल्याची घटना अकोले तालुक्यातील शासकीय एकदरे आश्रमशाळेत घडली. त्यामुळे शिक्षक खात्यात खळबळ उडाली आहे. आम्हास तुम्ही शाळेच्या बाहेर भेटा, तुमच्या डोक्यातच दगड घालतो, अशी दमबाजी करून मारहाण करण्याची धमकी दिल्याबद्दल एकदरे अनुदानित आश्रमशाळेतील आसाराम शंकर कानकाटे, संदीप भास्कर कोटकर, जालिंदर निवृत्ती कराळे, अरुण रामदास सोनवणे या ४ शिक्षकांविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकदरे आश्रमशाळेतील विक्रम सुधाकर आरोटे (वय ४०) या मुख्याध्यापकाने तेथील शिक्षकांना तुम्ही आदेश का पाळत नाहीत, असे विचारले. याचा राग मनात धरून आश्रमशाळेतील ४ शिक्षकांनी मुख्याध्यापकास शिवीगाळ केली. तसेच तुम्ही आम्हास शाळेच्या बाहेर भेटा, भेटल्यावर डोक्यातच दगड घालतो, अशी दमबाजीही केली. अशा अशयाची तक्रार अकोल्यातील एकदरे शासकीय अनुदानित आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विक्रम आरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत केली.

फिर्यादीत म्हटलेय, शाळेचे कामकाज तुम्ही का करत नाही, तुम्ही आदेश पाळत नाहीत व नोटीस दिली तर ती घेत नाहीत. याची विचारणा मी केली असता त्याचा राग मनात धरून एकदरे आश्रमशाळेतील शिक्षक आसाराम शंकर कानकाटे, संदीप भास्कर कोटकर, जालिंदर निवृत्ती कराळे, अरुण रामदास सोनवणे यांनी मला शिवीगाळ करून तुम्ही बाहेर भेटल्यावर तुमच्या डोक्यात दगड घालतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी राजूर पोलिसांनी एकदरे अनुदानित आश्रमशाळेच्या या चार शिक्षकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. ज्ञानदानाच्या मंदिरात शिक्षकांकडून सुरू असलेल्या या वादाची चर्चा शैक्षणिक वर्तुळातून चांगलीच रंगत आहे. यासंदर्भात आश्रम शाळेतील मुख्याध्यापक विक्रम आरोटे यांनी राजूर पोलिसांत फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...