आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सात जणांवर राहुरीत गुन्हा दाखल

राहुरी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावेत ही मागणी करत १९ वर्षीय विवाहित तरूणीचा शारिरीक व मानसिक छळ करणाऱ्या सात जणांवर राहुरी पोलिंसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी प्रविण कांबळे, वय १९ रा. आरणगाव, हल्ली मुक्काम उंबरे ता. राहुरी या विवाहितेने फिर्याद दिली आहे. शुभांगीचा विवाह प्रविण जाणकु कांबळे याच्याशी उंबरे येथे थाटामाटात झाला.

सासरच्या लोकांनी नांदायचे असेल तर गाडी घेण्यासाठी दोन लाख रुपये देण्यासाठी छळ केला. पोलिसांनी पती प्रविण जानकु कांबळे, सासु ताराबाई जानकु कांबळे, सासरे- जानक बाबुराव कांबळे व इतर चौघांवर विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत बऱ्हाटे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...