आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन:वंचित च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

शेवगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव पोलीस स्टेशन येथे वंचितचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्यावर तालुक्यातील खानापूर येथील एका हॉटेलची तोडफोड करुन हॉटेल चालकाला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात दाखल केला होता. या गुन्ह्याचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी शेवगाव पोलिस स्टेशन येथे घोषणाबाजी केली. त्यानंतर वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी बप्पासाहेब धाकतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किसन चव्हाण, प्यारेलाल शेख, संजय नांगरे, बन्नो शेख, गहिनीनाथ कातकडे , अरविंद सोनटक्के, बोरू मस्के, अरुण जाधव, ब्रह्मानंद साळवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात गणेश उत्सव सणानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, व शांतता टिकून राहावी याकरिता २५ ऑगस्ट ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात विवक्षित कृतींना मनाई करण्याकरिता आदेश असतानाही कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. निरीक्षक विलास पुजारी यांच्यासह इतर अधिकारी, अंमलदार यांच्या विरुद्ध नारेबाजी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, वंचिततर्फे खानापूर येथे अशी घटना घडलेली नसतांना खोट्या गुन्ह्यात चव्हाण यांचे नाव घातल्याचा आरोप करून निषेध व्यक्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...