आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:लाच मागणाऱ्या पोलिस‎ नाईकावर गुन्हा दाखल‎

शेवगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर‎ गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची‎ मागणी करणाऱ्या शेवगाव येथील‎ पोलिस नाईकावर मंगळ वारी‎ सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात‎ आला. संतोष काकडे असे लाचेची‎ मागणी करणाऱ्या पोलिस नाईकाचे‎ नाव आहे. शेवगाव पोलिस ठाण्यात‎ अपघाती तक्रार देण्यासाठी‎ तक्रारदार आले होते. तक्रारदारांच्या‎ वडिलांचा अपघात घडल्याने त्यांचा‎ मृत्यू झाला होता.

ज्या वाहनाने‎ त्यांच्या वडिलांना उडवले. त्या‎ वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यासाठी २० हजार रुपयांची‎ लाच पोलिस नाईक काकडे यांनी‎ तक्रारदाराकडे मागितली होती.‎ तक्रारदाराने रक्कम दिली असल्याचे‎ आरोपी काकडे याने मान्य केले.‎ याप्रकरणी‎ शेवगाव पोलिसात गुन्हा‎ दाखल करण्यात आला. ही कारवाई‎ लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक‎ विभागाच्या पोलिस निरीक्षक साधना‎ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ पोलिस हवालदार सचिन गोसावी,‎ चंद्रशेखर मोरे, मनोज पाटील,‎ विनोद पवार यांच्या पथकाने केली.‎

बातम्या आणखी आहेत...