आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:आरडाओरड करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

राहुरी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहसिल कार्यालय तसेच पोलिस स्टेशनच्या आवारात आरडाओरड करणाऱ्या दोन महिला व एक पुरूषावर राहुरी पोलिसांनी शांतताभंगाचा गुन्हा दाखल केला. दोन महिला व एक पुरूष आरडा ओरड करुन एकमेकांवर धावत होते. हा गोंधळ पाहण्यासाठी तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनच्या आवारात बघ्यांची गर्दी जमली. हा प्रकार पोलिसांच्या निर्दशनास आल्यावर पोलिसांनी वाद मिटविण्याचा सल्ला दिला.

मात्र दोन महिला व एक पुरूषातील वाद सुरूच राहिल्याने अखेर हवालदार अमोल पडोळे यांच्या फिर्यादीवरून सविता काळे, वंदना बुरुगुडे, दीपक लाटे राहणार चिंचोली, तालुका राहुरी या तिघांविरुद्ध शांतता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस नाईक शिवाजी खरात करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...