आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न:तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्यादीवरून गुन्हा दाखल

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तरूणाकडे एक लाखाची खंडणी मागणाऱ्या महिलेसह तिघांविरूध्द येथील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल हाडको परिसरातील भारत चौकात राहणाऱ्या तरूणाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

मंगळवारी सायंकाळी चार वाजता बोल्हेगाव उपनगरात ही घटना घडली. फिर्यादी तरूण मंगळवारी सायंकाळी बोल्हेगाव येथे असताना त्याने एका अनोळखी महिलेला फोन करून मुलगी आहे का, अशी विचारणा केली. त्या महिलेचा होकार येताच त्याने व्हॉट्सअपवर फोटो मागितले. महिलेने फोटा पाठविले व भेटण्यासाठी तिच्या बोल्हेगाव येथील राहत्या घरी बोलविले. तो तरूण घरी जाताच तेथे दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी घराचा दरवाजा बंद करत ‘तू येथे कशासाठी आला, तू पैसे दिले नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करू,’ अशी धमकी देत महिलेने एक लाख रूपयांची मागणी केली.

पैसे न दिल्यास अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. शेवटी त्या महिलेने फिर्यादी तरूणाकडे २५ हजार रूपयांची मागणी करत तिच्यासह मुलीच्या अंगावरील कपडे फाडले. घाबरलेल्या तरूणाने येथून पळ काढला. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना दिल्यावर संबंधीत महिलेसह दोन अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. नगर जिल्ह्यात अशा प्रकारे जाळ्यात ओढून युवकांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्यामुळे युवकांनी आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...