आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:रस्ता खोदल्या प्रकरणी गुन्हा दाखल‎

शनिशिंगणापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोन‌ई ते जुना वांबोरी रस्ता‎ अज्ञाताने खोदल्या प्रकरणी सार्वजनिक‎ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोन‌ई‎ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन‎ अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.‎ सोन‌ई जुना वबोरी डांबरी रस्ता बुधवारी रात्री‎ अज्ञाताने १९-२० चौरस मीटर सार्वजनिक डांबरी‎ पृष्ठभागावर रस्त्यांची सुरक्षितता कमी‎ करण्याच्या उद्देशाने किंवा खोदकामामुळे‎ रस्त्यांची सुरक्षितता कमी होते हे माहित‎ असतानाही नांगराच्या साह्याने खोदला व‎ शासनाच्या मालकीच्या सार्वजनिक रस्त्याचे १९‎ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले, अशी फिर्याद‎ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ‎ अभियंता शिवाजी महादुळे (वय ३४) दिली‎ आहे.

त्या नुसार सोन‌ई पोलीस ठाण्यात गुन्हा‎ रजिस्टर न ३९६/२०२२ नुसार गुन्हा दाखल‎ करण्यात आल. या प्रकरणी सोन‌ई पोलीस‎ ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक‎ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल‎ प्रविण आव्हाड हे करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...