आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:बोल्हेगाव फाटा येथील अपघातात चिमुरड्याचा मृत्यू

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोल्हेगाव फाटा येथे नगर मनमाड रोडवर झालेल्या अपघातात सारस नगरमधील शर्विल मुक्ताजी ससाणे (वय ७, रा. सारसनगर) या चिमुरड्याचा मृत्यू झाला. शर्विल व त्याचा भाऊ आईबरोबर दुचाकीवर जात होता. एका टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली.एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

शर्विल व त्याचा भाऊ हे आई बरोबर आजोबांकडे जात होता. यावेळी बोल्हेगाव फाटा येथे हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी शर्विल आणि त्याच्या आईला जिल्हा रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी शर्विलला तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. दरम्यान, रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढत असताना टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...