आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:कारवाई टाळण्यासाठी डंपर चालकाकडे पैशाची मागणी करणाऱ्या लिपिकाला मारहाण

शेवगाव शहर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खडीची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या शेवगाव तहसीलमधील एका लिपीकास डंपर चालक व त्याच्या साथीदाराने मारहाण केली. पैठण रस्त्यावरील कऱ्हेटाकळी शिवारात सुरु असलेल्या एका रस्त्याच्या कामावर बुधवारी सायंकाळी शेवगाव तहसिल कार्यालयातील एक लिपीक वरिष्ठांचे आदेश नसतांना गेला. तेथे खडी वाहतूक कऱणाऱ्या डंपर चालक व संबंधित व्यक्तींना कारवाई टाळण्यासाठी काही रकमेची मागणी केली. संबंधितांनीही त्यास होकार देवून त्याचे मोबाइलमध्ये शुटींग केले. त्यानंतर त्यास तेथेच चालक व संबंधितांनी बदडले. त्याने कसबसे तेथून सुटका करुन शेवगावला पळ काठला. मात्र याबाबत दोघांनीही तक्रार दाखल करण्याचे टाळले असले तरी या प्रकाराची खबर काही शेवगावात पोहोचली. तहसीलदार छगन वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन कारवाईसाठी कोण गेले होती. त्याची चौकशी करतो, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...