आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतकात अंधश्रद्धेवर मात‎:रविदास महाराजांच्या गुरुग्रंथ साहिबमधील‎ रचना आजही लोकप्रिय : प्राचार्य वाकचौरे‎

पिंपरणे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय संत रविदास महाराज यांनी‎ १३ व्या शतकात अंधश्रद्धेवर मात‎ करत समतेचा विचार करून महान‎ कार्याचा समाजात एक आदर्श‎ घालून दिला. ते सुधारक संतांमध्ये‎ अग्रणी होते. ते कुलभूषण कवी होते,‎ तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक‎ विद्वान होते. त्यांच्या गुरुग्रंथ‎ साहिबमधील रचना आजही‎ लोकप्रिय आहेत, असे प्रतिपादन‎ आदर्श प्राचार्य अण्णासाहेब‎ वाकचौरे यांनी केले.‎

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे‎ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने‎ राष्ट्रीय संत रविदास यांची ६४५ वी‎ जयंती चे आयोजन छत्रपती चौकात‎ करण्यात आले होते त्या वेळेस ते‎ बोलत होतेङ अध्यक्षस्थानी पांडुरंग‎ साळवे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून‎ शिवराम वाकचौरे, ग्रामसेवक सुनील‎ शेळके, कांताराम भालेराव,‎ उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अजित देशमुख, राजेंद्र देशमुख,‎ संजय बागुल, तंटामुक्ती अध्यक्ष‎ अरुण देशमुख,पोलिस पाटील‎ विनोद साळवे, धनंजय वाकचौरे,‎ गोकुळ काळे, शंकर देशमुख, बंडू‎ देशमुख, बापू साळवे, उत्तम राहिंज,‎ पोपट साळवे, नीलेश चत्तर, सुधीर‎ रोहम, सुधाकर कर्पे, बाळू काळे‎ आदी उपस्थित होते.‎

वाकचौरे म्हणाले, संत रोहिदास‎ महाराज हे १५ व १६ व्या शतका‎ दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय‎ रहस्यवादी कवी होते. रविदासांच्या‎ भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान,‎ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या‎ प्रदेशात गुरू म्हणून कायमचा प्रभाव‎ पडला आहे. ते कवी-संत,‎ समाजसुधारक आणि आध्यात्मिक‎ व्यक्तिमत्त्व होते. रविदास यांनी‎ जातीतील सामाजिक भेदभाव‎ हटवण्यास आणि वैयक्तिक‎ आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या‎ प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले.‎ कार्यक्रमाचे आयोजन धनंजय‎ वाकचौरे दत्तू वाकचौरे, नितीन‎ बागुल, सुरेश साळवे, प्रदीप मांडे‎ यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...