आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांगला परतावा व कमी वेळेत पैसे दुप्पट होतील, असे खोटे आश्वासन देत सुरेखा प्रमोद खैरे व त्यांचे पती प्रमोद खैरे (घुलेवाडी) या दांपत्याला विविध कंपन्यांमध्ये पैसे गुंतवण्यास भाग पाडत ४५ लाख २३ हजार ५१२ रुपयांना गंडा घालणाऱ्या चौघांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खैरे दांम्पत्याबरोबर गणेश राधाकिसन वर्पे (वरवंडी) याने ओळख करत बिग लाईफ केअर या आरओ कंपनीत झोनल मॅनेजर, एफएमएलसी ग्लोबल मार्केटिंग (हरियाना), संकल्प सिद्धी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमीटेड (नाशिक), आरआर वर्ल्ड फायनान्स कंपनी (मुंबई) अशा विविध मार्केटींग कंपन्यांमध्ये हिस्सेदार म्हणून काम करत असल्याचे सांगितले. कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून कमी वेळेत दुपटीने पैसे कमवून देतो, अशी हमी देत खैरे दांपत्याचा विश्वास संपादन केला.
तर रेश्मा देसाई या महिले सोबत खैरेंची ओळख करून देत बिजनेस पार्टनर असून तिला गुंतवणुकीतून आर्थिक फायदा करून दिल्याचे वर्पेने सांगितले. तर मामाचा मुलगा महेश मांढरे बिजनेस मॅनेजर असून त्याची ओळख करून दिली. डिसेंबर २०१७ पासून गणेश वर्पे, मंगल गणेश वर्पे (वरवंडी), रेश्मा आबासाहेब देसाई (पुणे) व महेश विजय मांढरे (आश्वी) या चौघांनी खैरे दांपत्याला ६ वर्षात जवळपास ४५ लाखाला गंडवले. त्यांनी पैशाची मागणी केली असता प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे खैरे यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस स्टेशन गाठले. सुरेखा खैरे यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.